“माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. ईडीपासून सुटका झाल्याने अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला”, असा दावा छगन भुजबळ यांनी केल्याचे जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात म्हटले गेले आहे.त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. यावर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.