महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज धुळ्यात होते. या सभेतून त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. यावेळी वाढवण बंदराचा विषय काढताना मोदींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली इच्छा देखील बोलून दाखवली. फडणवीसांची ही इच्छा महायुतीच्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर पूर्ण करणार, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.