सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी मतदारसंघात बापू पठारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्या सभेत सुप्रिया सुळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी या सभेत सांगितलं की, “येथील आमदाराने (सुनील टिंगरे) शरद पवारांना नोटीस पाठवली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात माझी बदनामी कराल तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन, असं त्या नोटिशीत लिहिलं होतं.” सुप्रिया सुळेंनी नाव न घेता सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केला. पण हा आरोप आता सुप्रिया सुळेंचा हा आरोप सुनील टिंगरे यांनी फेटाळला आहे.