पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर यांचं 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी तिकीट कापण्यात आलं. याबाबतचा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पिंपरी- चिंचवड मध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत केला. याच विधानावरून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत- धर यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त करत टोला लगावला आहे.