राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. मात्र, ऐन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडीक यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद रंगण्याची चिन्ह आहेत.”लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर महिलांचे फोटो काढून पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, असं विधान धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत बोलताना केला आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.