भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडीक यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. “लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर महिलांचे फोटो काढा”, असं धनंजय महाडीक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली. आता सुप्रिया सुळे यांनी धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.