महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मोठी रोकडही जप्त होत आहेत. कल्याणमध्ये गाडीत जवळपास १ कोटी रुपयांची रोकड सापडल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणच्या गांधारी परिसरात रविवारी (१० नोव्हेंबर) भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.