उद्धव ठाकरे हे सभेसाठी वणी येथे दाखल झाले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. आता उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ अमोल कोल्हेंच्याही बॅगेची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे. अमोल कोल्हे हे विटा येथे सभेला जात असताना त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.