शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औसा येथे पुन्हा बॅग तपासण्याच आली. औसा येथील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून हेलिपॅडवरच त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. तर याआधी सोमवारी (११ नोव्हेंबर) वणी येथेदेखील त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती. यावर ठाकरेंनी दरवेळा मीच पहिला गिऱ्हाईक असं म्हणत पुन्हा संताप व्यक्त केला आहे.