भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्यासह फोटो काढत असताना एका कार्यकर्त्याला लाथ मारली. ज्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवे यांनी लाथ मारली त्याते नाव शेख अहमद असं आहे. रावसाहेब दानवे यांचा शेख अहमद यांना लाथ मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेबाबत शेख अहमद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.