आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच,सभास्थळी एका मराठा आंदोलकानं उठून ‘एक मराठा लाख मराठा,मराठा आरक्षण घूस के लेगे’ अशा घोषणा दिल्या.या घोषणा देणार्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.