शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅक काही दिवसांपूर्वी वणी येथे तपासण्यात आली. तसेच त्यानंतर औसा येथे पुन्हा त्यांची बॅग तपासण्यात आली. खासदार अमोल कोल्हे यांची देखील बॅग काही दिवसांपूर्वी तपासण्यात आली. अशातच आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निवडणूक अधिकारी देवेंद्र फडणवीस यांची बॅग चेक करताना दिसत आहेत.