मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा बुधवारी (१४ नोव्हेंबर) वरळीत पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी कोकणातील नाणार, अणुऊर्जा आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. अणुऊर्जा प्रकल्प रद्द का करायला लावला? कोणत्या उद्योगपतीने सांगितलेलं? असा सवालही त्यांनी केला.