महायुतीत भाजपाकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी वारंवार घेतलं जातं. आगामी काळात जर देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी निवडला गेला तर पाठिंबा देणार का? याबाबत नवाब मलिक यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अणुशक्तीनगरच्या उमेदवार सना मलिक यांनी लोकसत्ताशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे.