Maharashtra Vidhansabha Election 2024 Bag Checking Rules: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे. अशातच आता गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ठिकठिकाणी पथकं नेमून वाहनांची तपासणी केली जाते आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरचीसुद्धा तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्सची तपासणी झाली आहे. दरम्यान, तपास करणारे हे अधिकारी नेमके कोण आहेत? त्यांना कोणते अधिकार असतात? जर अशा तपासणीवेळी पैसे आढळून आल्यास, त्याचं पुढे काय होतं? या सगळ्यासंदर्भात छत्रपती संभाजीनंतरचे निवडणूक अधिकारी विकास मीणा यांनी माध्यमांशी दिलेल्या माहितीच्या आधारे सर्व तपशील जाणून घेऊया.