Rajasthan By-Election Independent candidate Naresh Meena Slapped Malpura SDM : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवळी-उनियारा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येथून निवडणुकीला उभे राहिलेले अपक्ष उमेदवार नरेश मीना यांनी उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांच्या कानशीलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मतदारसंघात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या मागण्यांवरून चौधरी व नरेश मीणा यांच्यात वाद चालू होता. त्याचदरम्यान, मीणा यांचं स्वतःवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी थेट उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर हल्ला केला. मीणा यांनी चौधरी यांच्या कानशीलातही लगावली…