महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्याबाबात झालेल्या चर्चेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात? आम्ही जर त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल, असा इशार संजय राऊत यांनी दिली आहे.