Devendra Fadnavis Loksatta Exclusive: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगतो आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी तसे संकेत दिल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या. मात्र देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मुलाखतीत मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असं म्हटलं आहे. तसंच २०१९ मधल्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. मला संपवण्याचा प्रयत्न केलाय या दाव्याविषयी सुद्धा फडणवीस बोलले आहेत.