Sreejaya Chavan : विधानसभा निवडणुकांसाठी (VidhanSabha Election) भाजपाकडून (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली तेव्हाच या यादीमध्ये जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली तेव्हाच अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया अशोक चव्हाण ( Sreejaya Chavan ) यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली. श्रीजया चव्हाण ( Sreejaya Chavan ) यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीजया यांच्या प्रचारासाठी स्वतः भोकर येथून जाहीर प्रचारसभा घेत आहेत.