Devendra Fadnavis on Batenge to Katenge by Yogi Adityanath & Ajit Pawar : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय वादंग उठला आहे. योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) या घोषणेपासून आंतर राखलं आहे. या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी ते व त्यांचा पक्ष या घोषणेशी सहमत नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यापाठोपाठ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील अशा घोषणेची आवश्यकता नसल्याचं नमूद केलं. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’असा नारा दिला. मात्र, या दोन घोषणांमुळे महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.