Devendra Fadnavis Loksatta Exclusive: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगतो आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबतच्या महायुतीच्या भूमिकेबाबत भाष्य केले आहे. तसेच महाराष्ट्रातून मिळणाऱ्या सहानुभूतीविषयी सुद्धा फडणवीस बोलले आहेत.