MNS Manifesto by Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केला आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मूलभूत गरजांपासून मराठी अस्मितेच्या मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आलं आहे. ‘आम्ही हे करू’ या नावाने जाहीरनाम्याच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसंच, “आम्ही हे केलं” या पुस्तिकेतून त्यांनी त्यांच्या कामांचा आढावा घेतला.