इचलकरंजी येथे शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा असताना आज नोव्हेंबर महिन्यात चक्क वरुणराजाने हजेरी लावली आहे. एक विशेष योगायोग म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्यात केलेल्या एका सभेत सुद्धा पवारांनी पावसात भाषण केलं होतं आणि त्यानंतर राज्यात भाजपाला मोठा फटका बसला होता. हा योगायोग यंदाच्या निवडणुकीत सुद्धा कामी येणार का हे आत येत्या निवडणुकीच्या निकालातच कळेल. तत्पूर्वी शरद पवार यांच्या भाषणाची एक झलक पाहा.