धर्माचा वापर करून महाविकास आघाडी व्होट जिहाद करत आहेत. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी तीन मागण्या मविआला दिल्या होत्या. त्यामध्ये मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, RSS वर बंदी आणावी या मागण्यांचाही समावेश आहे. या पक्षांनी त्यांना पत्र देऊन या मागण्या मान्य करू असं म्हटल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.