महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीने विरोध केला.मात्र मविआकडून आता महिलांना ३००० रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आम्ही विरोध केला नाही असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.