Devendra Fadnavis Bhosari Speech: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ चा नारा दिला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आज देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ चा नारा दिला आहे. महाविकास आघाडी मतांचं ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप करत ही निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जात असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडी मतांसाठी पाय चाटण्याचं काम करत आहे. असं ही फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.