उद्धव ठाकरे भाजपावर टीका करत असताना म्हणाले, “पंकजा ताई तुझे खूप आभार. तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. जसे आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सोडून स्वतःच्या डोळ्यावर बांधली होती. तशी तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची काढली.” उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांच्या एका विधानाचा हवाला देत जाहीर सभेत त्यांचे आभार मानले आहेत.