एक है तो सैफ है या भाजपाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणेवरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. यावेळी त्यांच्या पत्रकार परिषदेत एक तिजोरी देखील आणण्यात आली होती. ज्यावर एक है तो सेफ है लिहिण्यात आलं होतं.