Chandrakant Patil Exclusive: ‘माझ्यासारखा जो दोनदा भाजपचा प्रदेशाध्यक्ष होता, ज्याच्याकडे आठ-आठ खाती होती, त्यालाही आज सांगता येणार नाही, की महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असेल. याचा अर्थ जे निर्णय करणार आहेत, त्यांनाही आज हे माहीत नाही. २०१९ ला झालेले राजकीय स्थित्यंतर राजकीय नेत्यांना धडा देऊन गेले, की तुम्ही ठरविण्याने काहीच होत नसते,’ असे विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात केले. लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही थेट भाष्य केले नाही.