Vinod Tawde Controversy: उद्याच्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष असताना विरारमध्ये खळबळजनक घडामोडी घडताना दिसत आहेत. विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. तसेच विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या आरोपांवर आता विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.