महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन करीत दारू आणि पैसे वाटप केल्या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.पैसे आणि दारू वाटपाची घटना मंगळवारी(ता-१९ नोव्हे) रोजी रात्री उशिरा घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.