Protest Against Praniti Shinde: काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज सोलापुरात प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या पोस्टारवर जोडे मारून शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांचा गद्दार असा बॅनर झळकावत शिवसैनिकांनी निषेध केला आहे..