महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. मतदान संपल्यानंतर तातडीने एक्झिट पोल्स समोर आले आहेत. विविध दहा एक्झिट पोल्सपैकी सहा पोल्सनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहेत. एका एक्झिट पोलने मुख्यमंत्री म्हणून कुणाला लोकांची सर्वाधिक पसंती आहे? आणि कुणाला कमी पसंती आहे याचा अंदाज वर्तवला आहे.