भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि त्यातून अब्जावधी रुपये गोळा केल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता गौतम अदाणी यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून गौतम अदाणी व त्यांच्या कंपनीवर टीका करणारे, घोटाळ्यांचे आरोप करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की इतकं सगळं करूनही गौतम अदाणी यांना अटक होणार नाही, असं विधान करत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे..