विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची गुरुवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. याविषयी खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.