पुण्यात मतमोजणीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. पुणे शहरातील कसबा, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कोथरूड, वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला या आठ विधानसभा मतदार संघाची मतमोजणीला कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे ८ वाजता सुरुवात होणार आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तर प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रतिनिधीची तपासणी करून आतमध्ये सोडले जात आहे. दरम्यान पुण्यात विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली आहे.