Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीला बहुमत मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसताना दिसून येत आहे. पुढील काही तासांमध्ये निवडणुकीचा निकाल (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) स्पष्ट होईल. महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आतापर्यंत आलेल्या कलानुसार दिसून येत आहे. त्यामुळे यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. “आम्ही आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह तोडला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.भाजपाच्या गटातील सध्याच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ समोर येत आहे.