Dadar Mahim Vidhan Sabha Constituency : दादर – माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान होते. परंतु, तरीही अमित ठाकरेंची जादू चालली नाही. तर, उद्धव ठाकरे यांचा शिलेदार महेश सावंत विजयी ठरले आहेत. त्यामुळे ते जायंट किलर ठरलेत.अमित ठाकरेंची जादू न चालण्याचं नेमकं कारण काय असू शकतं हे पाहूया.