भाजपने हिंदुत्वाचं कार्ड अचूकतेने खेळलं. धार्मिक नेत्यांची भूमिका राजकीय प्रचारात नसते. पण भाजपने विविध समाजाच्या आदरणीय धार्मिक नेत्यांना प्रचारात सामील करून घेतलं. वर्षभर हा उपक्रम सुरू होता. नागपूर शहरातच बागेश्वर धामचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. व्होटबँकला अपील झालं. राज्यात प्रचाराचा चेहरा किंवा विषय म्हणून दिसत नाही पण सहा महिने खरंतर जवळपास यासंदर्भात प्रयत्न सुरू होते. फक्त मतं नव्हे तर मतदारांचं हिंदूकरण हा भाजपचा प्रयत्न होता. त्यात ते यशस्वी झाले’, असं मत इंडियन एक्स्प्रेसच्या ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे यांनी व्यक्त केलं. ‘महाविकास आघाडी संविधानपुरतं मर्यादित राहिलं. महाविकास आघाडीत एकजूट नव्हती. भाजपला काटशहा देण्यासाठी एकोपा आवश्यक होता तो दिसला नाही’,
‘भाजप हा शहरी पक्ष आहे अशी प्रतिमा होती. २०१४ नंतर ही प्रतिमा बदलली आहे. गावांचं शहरीकरण होत आहे. भाजपने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केलं. ग्रामीण भागात बरेच प्रश्न आहेत. जातीय समीकरणं भाजपने बरोबर केलं’, असं त्यांनी सांगितलं.