Raj Thackeray On Vidhansabha Election 2024: राज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल १२८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. एवढंच नाही तर विधानसभेच्या प्रचारात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला होता. महाविकास आघाडी आणि महायुतीवरही जोरदार टीका केली होती. तसेच कोणत्याही परिस्थिती मनसे सत्तेत बसेल म्हणजे बसेल, असं विधान देखील राज ठाकरे यांनी केलं होतं. तसेच महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या, असं आवाहनही राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी जनतेला केलं होतं. मात्र, राज ठाकरे यांचं हे आवाहन जनतेने धुडकावून लावलं. यावर राज ठाकरेंनी सूचक पोस्ट केली आहे.