महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीला २३४ जागा मिळाल्या आहेत. याबाबत आता संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. जे काही घडलं त्याला धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत असा आरोप केला आहे.