Maharashtra Vidhansabha Election 2024 Mahayuti vs Mahavikas Aghadi Results update: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलून गेले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला २८८ पैकी २०० पार मजल सहज मारली. भाजपला २५ टक्के मते मिळाली आहेत. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये महायुतीला कौल मिळेल असे संकेत होते. मात्र त्यापेक्षाही पुढे जात राज्यात विरोधी पक्षाचा नेताही होणार नाही इतका प्रचंड विजय भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी मिळवला. नियमानुसार विरोधी पक्षनेता होण्यासाठी एकूण संख्येच्या किमान दहा टक्के विरोधी पक्षातील मोठ्या गटाला मिळणे गरजेचे असते. मात्र तितक्या जागाही काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मिळाल्या नाहीत. महायुतीच्या या दणदणीत विजयाची महत्त्वाची कारणे जाणून घेऊया.