Maharashtra CM Oath-Taking Event 2024 Shivsena Balaji Kalyankar Remark: विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंतच आहे. तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत नवं सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यामुळे महायुती २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर या बातम्यांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. दरम्यान, अनेक वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत की मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होईल. याविषयी आमदार बालाजी कल्याणकर काय म्हणाले पाहूया.