भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत १४८ जागा लढवल्या. त्यापैकी तब्बल १३२ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकून आले आहेत. भाजपाच्या संपूर्ण जागा जिंकण्यासाठी १६ जागा कमी पडल्या. त्यामुळे भाजपाच्या १६ उमेदवारांना पराभूत करणाऱ्या उमेदवारांची चर्चा सुरू आहे. नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवारांनी भाजपाचा हा विजयरथ रोखला हे जाणून घेऊ या.