Uddhav Thackeray Latest News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (२३ नोव्हेंबर) रोजी जाहीर झाले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आघाडी अशी लढत पाहायला मिळालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीने २८८ पैकी २३४ जागा मिळवल्या आहेत, तर भाजपा हा १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. यादरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचे एक वेगळेच कारण सांगितले आहे. उद्धव ठाकरेंनी एखाद्याच्या श्रद्धेची चेष्टा केल्याने त्यांना त्याची शिक्षा मिळाल्याचे केसरकर म्हणाले आहेत.