भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात बालेकिल्ल्याला साजेसे मताधिक्य घेत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील एकतर्फी लढतीमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळविला. एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ‘बाहेरचा’ उमेदवार हा शिक्काही पुसण्यात त्यांना यश आले आहे. विजयानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.