महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महायुती असा थेट सामना होता. महाराष्ट्रात काय होणार याचे विविध अंदाज लढवले जात होते, तसंच एक्झिट पोल्सनीही त्यांचे अंदाज वर्तवत महायुतीला यश मिळेल असं म्हटलं होतं. मात्र एक्झिट पोल्सने जे अंदाज वर्तवले ते साधारण १६० जागांपर्यंत होते. काही एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असंही म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. महायुतीला २३६ जागांवर विजय मिळाला आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगली आहे.