यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राजकीय सत्तासमीकरणं वेगळ्या पद्धतीने बदलू लागली आहेत. सर्वच अंदाज फोल ठरवत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. एकीकडे महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या तर दुसरीकडे मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. निवडणुकीत हा फटका बसल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भवितव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मनसेची मान्यताच रद्द होण्याची शक्यता असून याबाबतचे निकष नेमके काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.