२६ नोव्हेंबरला विद्यमान सरकारची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी बहुमत मिळालेल्या महायुती सरकारला सरकार स्थापण करणं आवश्यक आहे, असं बोललं जात आहे. त्यामुळे शपथविधी कधी होणार याबाबत चर्चा रंगली आहे. २६ तारखेच्या आधी शपथविधी न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. परंतु असं काहीही होणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.