Dilip Walse Patil Meets Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. महायुतीला राज्यात तब्बल २३५ जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालांनतर राज्यात मुख्यमंत्रीपदी कोण येणार? देवेंद्र फडणवीस की अजित पवार? अशी चर्चा सुरू झाली. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दोन्ही शिवसेना किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशीही चर्चा सुरू झाली. आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अशाच तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.